मुख्यमंत्री शिंदे यांच्या टार्गेटवर ठाकरे पिता-पुत्र ; म्हणाले, चाहिए खर्चा… निकालो मोर्चा
अधिवेशन संपण्यापूर्वी ठाकरेंच्या काळातील कथित कोरोना घोटाळ्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं घेरलं. मुंबईत कोरोना काळात कशाप्रकारे घोटाळा झाला याची यादीच शिंदेंनी वाचली. कोरोना काळातील घोटाळा आणि टेन्डरवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्राची चांगलीच चिरफाड केली.
मुंबई, २१ डिसेंबर २०२३ : हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी ठाकरेंच्या काळातील कथित कोरोना घोटाळ्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं घेरलं. मुंबईत कोरोना काळात कशाप्रकारे घोटाळा झाला याची यादीच शिंदेंनी वाचली. कोरोना काळातील घोटाळा आणि टेन्डरवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्राची चांगलीच चिरफाड केली. टेंडरमधला महत्त्वाचा प्यादा रोमिन छेडाच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यूपीतील हायवे बनवणाऱ्या कंपनीला मुंबईत पेंग्विन कक्षाचं कंत्राट देण्यात आलं. रोमिन छेडालाच कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटचंही काम देण्यात आलं. या रोमिन छेडालाच तीन आठवड्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडून ऑक्सिन प्लांट घोटाळ्यात अटक केली आहे. हे सर्व आदित्य राजाच्या कृपेने वरूण राजावर टेन्डरचा पाऊस पाडल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बघा नेमकं काय म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…