आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा एकदिवस...आमश्या पाडवींच्या पक्ष प्रवेशावेळी शिंदेंचा अप्रत्यक्षपणे निशाणा

आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा एकदिवस…आमश्या पाडवींच्या पक्ष प्रवेशावेळी शिंदेंचा अप्रत्यक्षपणे निशाणा

| Updated on: Mar 17, 2024 | 4:13 PM

'अन्यायाविरूद्ध पेटून उठा...अन्याय सहन करू नका हाच बाळासाहेब यांचा मूलमंत्र आत्मसाद करून खरी शिवसेना आपणच असून आपल्याकडेच शिवसनेचाच धनुष्यबाण आपल्याकडेच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.'

मुंबई, १७ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलं. ते म्हणाले, बाळासाहेब नेहमी म्हणायचे अन्यायाविरूद्ध लढा, अन्यायाविरूद्ध पेटून उठा…अन्याय सहन करू नका हाच बाळासाहेब यांचा मूलमंत्र आत्मसाद करून खरी शिवसेना आपणच असून आपल्याकडेच शिवसनेचाच धनुष्यबाण आपल्याकडेच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले की, नंदुरबार सारख्या दुर्गम भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसैनिकाने आदिवासी बांधवांचं काम केलं. म्हणून ते आमदार म्हणून निवडून आलेत. लोक त्यांना पाठिंबा देताय. त्यांचं हे काम आणि विश्वासार्हतेवर आज अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर कोणी गेलं की तो कचरा, गद्दार, चोर… आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा एकदिवस कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. हा नियतीचा खेळ आहे. आत्मपरिक्षण करण्याची वेळ आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

Published on: Mar 17, 2024 04:05 PM