मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडच्या सभेतून कोकणासाठी ३ मोठ्या घोषणा करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडच्या सभेतून कोकणासाठी ३ मोठ्या घोषणा करणार

| Updated on: Mar 19, 2023 | 6:32 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या खेडमधील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामांच्या घोषणेतून उत्तर देणार

मुंबई : रत्नागिरीच्या खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज जाहीर सभा होत आहे. ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी त्याच मैदानावरून एकनाथ शिंदे आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या खेडमधील सभेला आणि त्यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासकामांच्या घोषणेतून उत्तर देणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खेडच्या सभेतून कोकणासाठी ३ मोठ्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून नेमकं काय मिळणार? याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.

Published on: Mar 19, 2023 06:32 PM