महिलांनो… ‘लाडक्या बहिणी’चे पैसे येण्यास सुरूवात, तुमचं बँक खातं ‘आधार’शी लिंक नसेल तर…
लाडक्या बहिणींना आधार बँक खात्याशी लिंक करण्यासाठी ३ दिवसांची मुदत दिली असल्याने महिलांची चांगलीच धावाधाव सुरू आहे. दहा दिवसांनंतर उर्वरित ३३ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. दरम्यान योजनेचा लाभ मिळावा म्हणून मुंबई, नागपूरसह राज्यभरात आधार केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
रक्षाबंधनच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. येत्या १७ ऑगस्टपर्यंत १ कोटीहून अधिक ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. मात्र अद्याप २७ लाख महिलांचे बँक खाते अधारशी लिंक नाही, त्यामुळे त्या बहिणींच्या खात्यात उशिराने पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी लाडकी बहिण योजनेवरून मोठा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीला आशीर्वाद दिला नाहीतर पैसे पुन्हा परत घेणार, असे वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणांनी केलं होते. याचाच आधार घेत मनोज जरांगे पाटील यांनी देखील हल्लाबोल चढवला आहे. बघा काय म्हणाले?
Published on: Aug 15, 2024 10:27 AM
Latest Videos