CM Ladki Bahin Yojana : महिलांनो… आनंदाची बातमी, ‘लाडकी बहीण’चे पैसे ‘या’ तारखेलाच खात्यात जमा होणार
राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली अन् त्याची तुफान चर्चा सुरू झाली. या योजनेचं नाव 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' असे असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुसतीच चर्चा नाहीतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
विधासभा निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली अन् त्याची तुफान चर्चा सुरू झाली. या योजनेचं नाव ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. नुसतीच चर्चा नाहीतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार… असा प्रश्न पडला आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यावरुन 16 जुलैला पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अशातच मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तर 15 ऑगस्टपर्यंत या योजनेत पात्र असलेल्या राज्यातील सर्व महिलांना 1500 रूपयांची रक्कम देण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.