लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी… नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर अतिरिक्त भार पडणार नसल्याचेही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, असं सरकारने नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे. इतकंच नाहीतर लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर अतिरिक्त भार पडणार नसल्याचेही सरकारकडून सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही माहिती देण्यात आली आहे. अनिल वडपल्लीवार यांच्याकडून लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तर सरकारच्या उत्तरावर म्हणजेच सादर केलेल्या शपथपत्रावर याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रातीला येण्याची शक्यता होती. मात्र अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट बघावी लागणार आहे.