Ladki Bahin Yojna Rangoli : मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट ‘लाडकी बहीण’ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पहिल्यांदाच नागपुरात दाखल होणार आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन नागपुरात होत आहे. नागपूरात त्या आगमनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळे स्वागताचे उपक्रम राबविले जात आहे.
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार असं आश्वासन सरकारने केलं होतं. त्यामुळे आता पुढचा हफ्ता किती मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पहिल्यांदाच नागपुरात दाखल होणार आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन नागपुरात होत आहे. नागपूरात त्या आगमनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी वेगवेगळे स्वागताचे उपक्रम राबविले जात आहे. मुख्यमंत्री सचिवालयामध्ये एक भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही रांगोळी साकारण्यात आली असून त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो सुद्धा हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहेत तर दुसरीकडे लाडक्या बहिणींचा फोटो सुद्धा रांगोळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्याच्या सचिवालयात अशा प्रकारे या महत्त्वाकांक्षी योजनेची रांगोळी काढून स्वागताची तयारी केली जात आहे.