भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?
हिंगोलीतमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर बाबुराव कोहळीकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी स्वतः हेमंत पाटील हजर नव्हते. यवतमाळमध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल करताना भावना गवळी गैरहजर राहिल्याचे दिसले.
यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवाराने अर्ज दाखल केलेत. मात्र यवतमाळमध्ये राजश्री पाटलांचा अर्ज दाखल करताना भावना गवळी मात्र गैरहजर होत्या. हिंगोलीतमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर बाबुराव कोहळीकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी स्वतः हेमंत पाटील हजर नव्हते. यवतमाळमध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल करताना भावना गवळी गैरहजर राहिल्याचे दिसले. म्हणजेच नाराजी स्पष्ट दिसले. तर भावना गवळी आणि हेमंत पाटील यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. हेमंत पाटलांबाबत मुख्यमंत्र्यांनी खासदारकीचे संकेत दिलेत. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार त्यांच्या आदल्या दिवशीच त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. पण त्यांच्या पत्नीला यवतमाळमाळमधून भावना गवळींची उमेदवारी नाकारत तिकीट देण्यात आलं. त्यामुळे भावना गवळींचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.