सुषमा अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबराव पाटलांचं उपरोधिक प्रत्युत्तर, ‘मी तयार पण..’
40 रेडे फुटून गेले म्हणणारा माणूस संजय राऊत याला माझे चॅलेंज आहे. तेरा पैलवान मेरे सामने उतार दे, असे आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनाच आपल्या समोर मैदानात उतरवा असे आव्हान त्यांनी केले आहे.
‘सुषमा अंधारे येऊन म्हणाल्या की रेड्याला कापणार, मी तयार असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे. तर रेड्याला कापण्यासाठी तलवार असलेला माणूस शोधतोय’, असं खोचक प्रत्युत्तर देखील विरोधकांच्या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी दिलंय. जळगाव येथील धरणगावच्या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उद्धव ठाकरे गटाचा खुरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बोलून गेल्या होत्या की, या रेड्याला आम्ही कापणार आहोत. तो रेडा आता तयार आहे. तुझ्याकडे कापण्याला कोणी माणूस तलवार घेऊन उभा आहे का याची तलाश हा गुलाबराव पाटील करतो आहे, असा उपरोधिक टोला सुद्धा गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांना यावेळी लगावला.
Published on: Sep 22, 2024 12:38 PM
Latest Videos