'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', 5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापूंचं थेट प्रत्युत्तर

‘राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर…’, 5 कोटींच्या घबाडाचा आरोप होताच शहाजी बापूंचं थेट प्रत्युत्तर

| Updated on: Oct 22, 2024 | 4:34 PM

काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा होतोय. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला. त्यावर शहाजीबापूंचं थेट प्रत्युत्तर

पुण्यात खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीत ५ कोटी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच नाव घेत महायुतीवर गंभीर आरोप केले. पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर मार्गावर सांगोल्याकडे जाणारी रक्कम जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. ५ कोटी रूपये जप्त करण्यात आलेत तर १० कोटी रूपये झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचले, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केला आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून पोलिसांना फोन गेला होता, असं संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राऊत यांच्या बोलण्याचा रोख शहाजी पाटलांकडे असल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मला विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनम करण्याचा प्रयत्न केला जातोय. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही, असे शहाजी बापू पाटील म्हणाले.

Published on: Oct 22, 2024 04:32 PM