Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर दाखल
राज्याच्या राजकारणात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) मुद्दा चांगलाच गाजतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलाय. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर (Matoshri) जात हनुमान चालिसा पठण करणार, असं रवी राणा म्हणालेत. राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर इकडे […]
राज्याच्या राजकारणात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) मुद्दा चांगलाच गाजतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलाय. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर (Matoshri) जात हनुमान चालिसा पठण करणार, असं रवी राणा म्हणालेत. राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर इकडे मातोश्रीवर सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यानंतर दुपारी साडे चार वाजता मुख्यमंत्री स्वत: मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी मातोश्रीवर जमा झालेल्या शिवसैनिकांचे हात जोडून आणि हात उंचावून आभार मानले.
Latest Videos