Uddhav Thackeray | स्वर्णिम विजय वर्षानिमित्त गेट-वे-ऑफ इंडियावर कार्यक्रम
स्वर्णिम विजय वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले.
भारताने पाकिस्तानला 1971 च्या युद्धात नमवत विजयी पताका फडकावल्या होत्या. याच विजयासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. दरम्यान यंदा स्वर्णिम विजय वर्षानिमित्त मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया या भारताच्या सीमारेषेवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला सैन्यातील मोठे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारताच्या विजयाबद्दल माहिती देण्यात आली. 1971 साली पाकिस्तान विरुद्ध लढण्यात आलेल्या आठवणींना यावेळी उजाळा देत भारताचा विजय पुन्हा एकदा आठवण्यात आला.
Latest Videos