Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 26 September 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. त्यानंतर आता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. आज दिल्लीत असंच काहीसं चित्रं दिसलं. उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजन घेतलं. यावेळी आजी, माजी आणि भावी असं चित्रं पाहायला मिळालं.
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. या बैठकीत नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षली भागात करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जेवणही घेतलं. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.