CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

| Updated on: Dec 18, 2021 | 11:12 AM

इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ हा सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने मोठी आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे.

मुंबई :  CNG PNG Price Hike इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ हा सामान्य नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने मोठी आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता दुसरीकेड सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. मुंबईला सीएनजी व पीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीनुसार सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो दीड रुपयांची वाढ झाली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

Published on: Dec 18, 2021 11:11 AM