सहकारी साखर कारखान्यांवर खासगीकरणाची वेळ येऊ देणार नाही- Amit Shah
राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दिली.
राज्यातील साखर कारखाने सुरू राहील यावर आमचा भर राहील. राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याचं खासगीकरण करणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज दिली.
अमित शहा आज प्रवरानगरमध्ये आले होते. यावेळी सहकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारकडून सहकार क्षेत्रासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील साखर कारखान्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. साखर कारखाने सुरू राहील हे आमचं काम राहील. कोऑपरेटिव्ह साखर कारखान्यांचा खासगीकरण होणार नाही यासाठी याचा आम्ही प्रयत्न करू, असं शहा म्हणाले.
Latest Videos