Mumbai Coastal Road | ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’, मुंबईकरांसाठी कोस्टल रोड छायाचित्र प्रदर्शन

Mumbai Coastal Road | ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’, मुंबईकरांसाठी कोस्टल रोड छायाचित्र प्रदर्शन

| Updated on: May 08, 2023 | 7:30 AM

VIDEO | मुंबईकरांसाठी खास किनारी मार्ग अर्थात कोस्टल रोड छायाचित्र प्रदर्शन, बघा एक झलक

मुंबई : मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडचे (Mumbai Coastal Road) काम कशाप्रकारे होत आहे आणि ते पूर्ण झाल्यावर कसे असणार आहे. याचे संपूर्ण चित्र प्रदर्शन काल भरवण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या सहकार्याने नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले केले होते. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची रचना, नियोजन, त्यासाठी वापरण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण अभियांत्रिकी कौशल्य, प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि प्रकल्प साकारताना राखलेला पर्यावरणाचा समतोल या सर्व गोष्टी छायाचित्रांच्या माध्यमातून यावेळी दाखवण्यात आल्या आहेत. यावेळी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले होते.

Published on: May 08, 2023 07:30 AM