लेकरांना न्याय देण्यासाठी येतोय, मुंबईकरांनो साथ द्या, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

| Updated on: Dec 29, 2023 | 9:19 PM

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्यासाठी येत्या 20 जानेवारीला अंतरवेली सराटीतून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत. आपल्या सोबत सर्व गरजेच्या वस्तू घ्याव्यात. गाडीला, ट्रॅक्टरालाच घर बनवावे असे आवाहन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ही शेवटची संधी आहे. आपल्या लेकरांना तु्म्ही आयुष्याची प्रॉपर्टी दिली. आता त्यांना आयुष्याचं आरक्षण देण्यासाठी हीच वेळ असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

जालना | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी 200 हून अधिक लोकांनी बलिदान दिले आहे. हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. 20 जानेवारीपासून अंतरवेलीतून लोक पायी चालत निघणार आहेत. सर्वांनी घराच्या बाहेर पडावे. आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे आपआपसातील मतभेद विसरुन आरक्षण घेण्यासाठी बाहेर पडा. आपली शिकलेली पोरं एका टक्क्यांमुळे घरी पडली आहेत. काम बुडाली तरी हरकत नाही. रजा टाका पण सर्वांनी घराबाहेर पडावे आणि मुंबईला निघावे असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठी तरुणांवरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. आमच्या लोकांना सरकार नोटिसा देत आहे. आता तुम्ही गोळ्या घातल्या तरी आम्ही माघार घेणार नाही. आरक्षण मिळवूनच मुंबईतून बाहेर पडणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या आधीही आम्ही सरकारला तीन महिन्याचा वेळ दिला. नंतर 40 दिवस नंतर दोन महिने. त्याही वेळेत सरकारने आरक्षण दिलं नाही. नोंदी मिळाल्या. आमच्या मागणीसाठी चार दिवसाचा वेळ दिला होता. कायदा पारित करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. आता 54 लाखांच्या नोंदी सापडल्या, मग कायदा पारीत करून आरक्षण देण्यात अडचण काय ? हेच आमचं म्हणणं आहे. 54 लाख लोकांच्या नोंदी सापडल्याने त्यांना आरक्षण मिळालं. हा मराठ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. पण आम्हा सर्वांना आरक्षण पाहिजे. त्यावर आम्ही ठाम आहोत असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 28, 2023 01:32 PM
माधुरी दीक्षित राजकारणात येणार का ? या प्रश्नावर माधुरीने काय दिलं उत्तर पाहा
जरांगे पाटलांना हे सरकार खेळवतंय, एकनाथ खडसे यांनी केला आरोप