Nawab Malik यांच्या राजीनाम्यावर Chandrakant Patil यांचे भाष्य

| Updated on: Mar 19, 2022 | 2:17 AM

ऐन होळीच्या रंगात आता राजीनाम्याला चांगलेच धार्मिक रंग चढताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक मंत्रालय आहे. तसेच मलिक हे परभणी आणि गोंदियाचे पालकमंत्रीही आहेत.

कोल्हापूर : नवाब मलिक (Nawab Malik) यांना ई़डीने अटक केल्यापासून त्यांच्या राजीनाम्यावरून राज्या पॉलिटिकल कल्ला सुरू आहे. भाजप मलिकांच्या राजीनाम्यावर अडून बसलंय. तर राष्ट्रवादी राजीनामा न घेण्यावर. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे भाजप त्यांचा संबंध दाऊदशी जोडत आहे, असा आरोप आधी पवारांनी (Sharad pawar) केला तर आता राष्ट्रवादी मुस्लिमांना खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. त्यांना आज कोल्हापुरात बोलताना पुन्हा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर जोरदार शरसंधान साधलं आहे. ऐन होळीच्या रंगात आता राजीनाम्याला चांगलेच धार्मिक रंग चढताना दिसत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे सध्या अल्पसंख्याक मंत्रालय आहे. तसेच मलिक हे परभणी आणि गोंदियाचे पालकमंत्रीही आहेत.