फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप ?

| Updated on: Dec 12, 2024 | 1:53 PM

परभणीत संविधानाचा अपमान केल्याची घटना घडल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही परभणीत तणावाची परिस्थिती असल्याची स्थिती आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व जाते तेव्हाच जातीय तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

परभणीत संविधानाचा अपमान केल्याच्या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणात काल आंबडेकरी अनुयायी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रस्त्यावर टायर जाळून आणि दुकानावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून या प्रकरणातील तणावाग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पदावर फडणवीस येतात तेव्हाच जातीय तणाव निर्माण केला जातो असा आरोप भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे. आधी जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा भीमा- कोरेगावची दंगल झाली. त्यानंतर कोपर्डी अत्याचार प्रकरण झाले. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मोर्चे काढण्यात आले होते. आता पुन्हा परभणीत जातीय तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप अमर साबळे यांनी केला आहे.

Published on: Dec 12, 2024 01:53 PM