Breaking | शासकीय अधिकाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती धोरण लागू ; राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय

| Updated on: Aug 26, 2021 | 7:22 PM

यावेळी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा महत्त्वाचे निर्णय घेतले. 

मुंबई : शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे, निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज (26 ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा महत्त्वाचे निर्णय घेतले.