Chandrakant Patil | सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मविआमध्ये स्पर्धा सुरु – चंद्रकांत पाटील
गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत’, असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पवारांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही मोठा गौप्यस्फोट केलाय. ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच घटक पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे’, असा दावा चंद्रकांतदादांनी केलाय. ‘राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत’, असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.