Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच, कोणाच्या नावाची चर्चा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की…? महायुतीत रस्सीखेच, कोणाच्या नावाची चर्चा?

| Updated on: Dec 22, 2024 | 1:37 PM

पालकमंत्रीपदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की प्रताप सरनाईक यांना देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे. पालकमंत्रीपदावरून महायुती सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेणार की प्रताप सरनाईक यांना देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासह ठाण्याच्या पालकमंत्रीपद भाजपच्या गणेश नाईक यांचं ही नाव चर्चेत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळतेय. तर बीड जिल्ह्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पालकमंत्री होणार? हा प्रश्न उपस्थित होतोय. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे पालकमंत्री होणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Dec 22, 2024 01:37 PM