रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीत चुरस, किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने गोंधळ
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीत कोणाला तिकीट मिळणार यावरुन चुरस सुरु आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रोकेगा कौन ?असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सर्वांनाच गॅसवर आणले. नंतर त्यांनी माघार घेत चर्चेत येण्यासाठी असे केल्याचे म्हटले. तसेच भाजपाचे रवींद्र चव्हाण जरी उभे राहिले तरी आपण त्यांचा प्रचार करु असे म्हटले.
रत्नागिरी | 1 जानेवारी 2023 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीत जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. यातच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी ‘रोकेगा कौन ? ‘ असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकच खळबळ उडविली. नंतर माघार घेत भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना जरी तिकीट मिळाले तरी आपण त्यांच्यासाठी प्रचार करु असे म्हटले आहे. या रत्नागिरी लोकसभेसाठी महायुतीत रवींद्र चव्हाण यांनी तयारी सुरु केली आहे. तर शिंदे गटातील उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील तयार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे देखील या तिकीटासाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून माघार घेण्याची घोषणा केली होती, त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी त्यांची मनधरणी करीत त्यांची भेट फडणवीस यांच्या घालून दिली होती. महाविकास आघाडीचे या जागेवर 2019 मध्ये निवडून आलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या 10 जानेवारीनंतर शिंदे गटाचे नेते तिकीटासाठी एकमेकांच्या उरावर बसतील असे म्हटले आहे. या जागे कोणीही उभे राहू देत त्याचा किमान अडीच लाख मतांनी पराभव करण्यासाठी काम सुरु असल्याचे म्हटले आहे.