मोदींची तुलना औरंगजेबाशी... संजय राऊतांविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींची तुलना औरंगजेबाशी… संजय राऊतांविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

| Updated on: Mar 22, 2024 | 5:20 PM

भाजपकडून संजय राऊत यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे विद्वेष पसरवणारं आहे, असा भाजपने आरोप केला होता. बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची काहिशी अडचण वाढवणारी बातमी समोर येत आहे. संजय राऊत यांनी औरंगजेबची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली होती. त्याच वक्तव्याच राऊतांविरोधात भाजपकडून तक्रार करण्यात आली आहे. भाजपकडून संजय राऊत यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे विद्वेष पसरवणारं आहे, असा भाजपने आरोप केला होता. बुलढाण्यातील एका सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. संजय राऊतांचं विधान हे मोदींचा अपमान आणि बदनामी करणारं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाल त्याची दखल घ्यायला लावू, विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू, अशी तक्रार भाजपने आयोगाकडे केली आहे. दरम्यान,  ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आणि कारवाईची मागणी केली होती.

Published on: Mar 22, 2024 05:20 PM