उर्फी जावेद म्हणते मुक्तपणे वावरता येत नाही, केली राज्य महिला आयोगाकडे तक्रार

उर्फी जावेद म्हणते मुक्तपणे वावरता येत नाही, केली राज्य महिला आयोगाकडे तक्रार

| Updated on: Jan 17, 2023 | 11:19 AM

माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, राजकीय स्वार्थापोटी चित्रा वाघ यांनी मारहाणीच्या धमक्या दिल्या, अशी तक्रार उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे केली असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली

गेल्या काही दिवसांपासून तोकडे कपडे आणि विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद प्रसिद्धीच्या झोतात आहे. दरम्यान, आता उर्फीने आपल्या जीवितास धोका असल्याची भिती व्यक्त करत तिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत उर्फी म्हणते, राजकीय स्वार्थापोटी चित्रा वाघ यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्यात. त्यामुळे माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो. असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने मुक्तपणे वावरता येत नाही, मला सुरक्षा देण्यात यावी, अशी तक्रार आणि मागणी उर्फीने महिला आयोगाकडे केली असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली आहे. ही तक्रार मिळताच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून सविस्तर चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

Published on: Jan 17, 2023 11:16 AM