Ajit Pawar Letter : महायुतीमध्ये सामील होऊन 100 दिवस, अजितदादांचं जनतेला पत्र, बघा काय म्हटलं?

Ajit Pawar Letter : महायुतीमध्ये सामील होऊन 100 दिवस, अजितदादांचं जनतेला पत्र, बघा काय म्हटलं?

| Updated on: Oct 10, 2023 | 7:20 PM

VIDEO | माझ्या बंधू आणि भगिनींनो... म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला पत्र लिहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये सामील होऊन, आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं आपल्या सर्वांशी साधलेला हा पत्रसंवाद असे अजित पवार यांनी म्हटलंय

मुंबई, १० ऑक्टोबर २०२३ | सध्या राजकीय वर्तुळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसतंय. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. हे पत्र अजित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून हे पत्र लिहिले असून राष्ट्रवादी पक्षातील अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी होऊन आज १०० दिवस पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. हे १०० दिवस पूर्ण झाल्याने अजित पवार यांनी हे पत्र राज्यातील जनतेला लिहीले आहे. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणत या पत्राची सुरूवात केली आहे. तर या पत्रात त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर केला आहे.

Published on: Oct 10, 2023 07:13 PM