वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक, रविवारी केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन, मोदींना पाठवणार सिलिंडर

| Updated on: Jan 15, 2022 | 10:46 PM

अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. याविरोधात रविवारी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.

मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या  केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modiसरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅसची सबसीडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या (Women Congressवतीने रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येणार असून उज्ज्वला योजनेचे गॅस सिलिंडर परत करून मोदी सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे (Sandhya Savvalakhe)  यांनी दिली आहे.