कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार टीका

कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार टीका

| Updated on: Oct 05, 2024 | 6:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्याच्या कासारवडवली येथील मैदानात झालेल्या सभेत कॉंग्रेसला देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्याच्या सभेत भुयारी मेट्रो तीन मार्गिकेसह अनेक योजनांचे लोकार्पण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी ही महा विकास विरोधी आहे अशी टीका केली. महाविकास आघाडीने अटल सेतुला रोखण्याचा प्रयत्न केला. यांनी बुलेट ट्रेनचं एकही काम होऊ दिले नाही. भुयारी मेट्रोच्या कामात देखील खोडा घातला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. महाराष्ट्राच्या विकासाच्या विरोधात असलेल्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर शेकडो मैल दूर ठेवायला हवे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. कॉंग्रेस भारत की सबसे बेईमान आणि भ्रष्ट पार्टी आहे. कोणताही काळ असो कॉंग्रेसचे चरित्र बदललेले नाही. याच आठवड्याचा विचार केला तर कॉंग्रेसचा एक मुख्यमंत्री जमीन घोटाळ्यात अडकला आहे. त्याचे एक मंत्री महिलांना शिव्या देत आहेत.त्यांचा अपमान करीत आहेत. हरियाणात कॉंग्रेस नेते ड्रग्ज सोबत पकडले गेले. कॉंग्रेस निवडणूकी पूर्वी मोठी आश्वासनं देते आणि निवडून आल्यानंतर जनतेला लुटण्याचे एकाहून एक उपाय शोधत राहते अशीही टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केली.

Published on: Oct 05, 2024 06:10 PM