महाविकास आघाडी की महायुती? गणपती बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?

महाविकास आघाडी की महायुती? गणपती बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?

| Updated on: Sep 22, 2023 | 5:51 PM

VIDEO | टिव्ही ९ मराठीच्या गणपती बाप्पाचं अशोक चव्हाण यांनी घेतलं दर्शन, 2024 च्या आगामी निवडणुकीला गणपती बाप्पा कोणाला आशीर्वाद देणार? काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काय केलं सूचक वक्तव्य?

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | राज्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य माणसांप्रमाणे कलाकार, दिग्गज व्यक्ती आणि राजकीय वर्तुळातील नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झाले आहे. अशातच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतले. यावेळी राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये गणपती बाप्पा कुणाला आशीर्वाद देणार असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण यांची थेट भाष्य केले आहे. 2024 च्या आगामी निवडणुकीमध्ये गणपती बाप्पा काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीलाच देणार आशीर्वाद देणार आहे. महाविकास आघाडी पक्षाने कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही. इतर राजकीय पक्षांप्रमाणे आम्ही कुणाला फोडले नाही किंवा फोडण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि इतरांपेक्षा महाविकास आघाडी चांगले काम करत आहे, असे जनतेला पटलेले आहे तर महाविकास आघाडी हाच योग्य पर्याय असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Sep 22, 2023 05:51 PM