Maharashtra Band | लोकशाही वाचवण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक : बाळासाहेब थोरात
देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपुरातल्या घटनेने देशातील शेतकरी वर्ग भयभीत आहे. आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे, असं बाळाासहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपुरातल्या घटनेने देशातील शेतकरी वर्ग भयभीत आहे. आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे, असं बाळाासहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
Latest Videos