म्हणून विजय माझाच होणार, प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक असताना रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला विश्वास
VIDEO | काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा विजय का होणार, याचे स्पष्ट सांगितले कारण, बघा काय व्यक्त केला विश्वास?
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट सातत्याने निवडून येत आहेत. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ही जागा मुक्ता टिळक यांनी जिंकली. ही जागा नेहमी भाजप का जिंकते याचे रहस्य कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यादिवशीच माझा विजय निश्चित झाला असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी प्रचाराचे अवघे काही तास बाकी असताना जनतेला विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जनतेने मला निवडणुकीत आशीर्वाद द्यावा. त्याची परतफेड मी विकासाच्या मुद्द्यावर करून देईल. तर जनतेचा पाठिंबा असेल तोच विजयी होईल असे म्हणत विजय माझाच आहे, असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
Latest Videos