अर्ज किया है... यशोमती ठाकूर यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करताना बाईक रॅली

अर्ज किया है… यशोमती ठाकूर यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल करताना बाईक रॅली

| Updated on: Oct 24, 2024 | 2:41 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर एकेक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवताना दिसताय. सर्वात प्रथम भाजप त्यापाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. यानंतर आजपासून अनेक दिग्गज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसताय.

काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. विधानसभेसाठी अर्ज भरताना काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्याकडून अनोखं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. यशोमती ठाकूर हे बाईक रॅली काढून आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना पाहायला मिळाल्या. यशोमती ठाकूर या स्वतः या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या असून त्या कार्यकर्त्यांसोबत गाडी चालवताना दिसल्या. यशोमती ठाकूर या पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. अमरावतीमधील तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर या आपल्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. यशोमती ठाकूर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार असल्याची माहिती मिळतेय. तर यावेळी समाधीजवळ असलेल्या तुकडोजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला ते जेसीबीच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करणार आहेत. याचे दर्शन घेतल्यावर मोझरी ते तिवसा पर्यंत यशोमती ठाकूर यांची बाईक रॅली निघणार आहे.

Published on: Oct 24, 2024 02:41 PM