नाना पटोले पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार, काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
णे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता पुणे महापलिका निवडणुकित लक्ष घालणार, असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आपली रणनीती व फौज उभारण्यासाठी पुणे शहर कॉंग्रेसला एक कोअर कमिटी करून देण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकीची रंगत यायला सुरू झाली आहे. कोअर कमिटीचे मुख्य समन्वयक म्हणून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नियुक्ती करण्यात आलीय. या निवडणुकीत मोठी जबाबदारी ही संग्राम थोपटेंवर असणार आहे. या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेतून उतरवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत. काही दिवसातच पुण्याबरोबर राज्यातल्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत.
Latest Videos