पाण्यासाठी केलं रक्तदान अन् म्हणाले... 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!', कुठं झालं अनोखं आंदोलन?

पाण्यासाठी केलं रक्तदान अन् म्हणाले… ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’, कुठं झालं अनोखं आंदोलन?

| Updated on: Apr 28, 2023 | 1:00 PM

VIDEO | 'हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!' घोषणाबाजीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर कुणाचा धडकला मोर्चा?

ठाणे : अंबरनाथमधील पाणी समस्येविरोधात काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ असं म्हणत पाण्यासाठी रक्तदान शिबिर सुद्धा काँग्रेसने सुरू केलं आहे. अंबरनाथ शहराच्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावते आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे अखेर काँग्रेसने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणा देत काँग्रेसने थेट रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं आहे. रक्तदान शिबिरात जमा झालेलं रक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देऊन पाणी मागणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोणता निर्णय घेणार किंवा त्यांची याबाबत कोणती भूमिका असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Published on: Apr 28, 2023 01:00 PM