कसबा पोटनिवडणुकीत भाजप VS काँग्रेस लढत, यासह जाणून घ्या दिवसभरातील अपडेट्स
कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेसची लढत. भाजपकडून हेंमत रासणे यांना उमेदवारी निश्चित तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांचे नाव जवळपास निश्चित
मुंबई : कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरूद्ध काँग्रेसची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून हेंमत रासणे यांना उमेदवारी निश्चित तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांचे नाव जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात असून आज उमेदवारी जाहीर होणार आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा तर राष्ट्रवादीकडून नाना काटे, मोरेश्वर भोंडवे हे देखील उत्सुक असून संधी कोणाला मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून पोटनिवडणुकीसाठी मनसेही आज उमेदवार जाहीर करणार आहे. कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत भाजपची असलेली नाराजी दूर झाली असून देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर शैलेश टिळक आणि शंकर जगताप यांची नाराजी दूर झाली आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या घडामोडी
Published on: Feb 05, 2023 07:38 AM
Latest Videos