Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harshwardhan Sapkal Video : फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! हर्षवर्धन सपकाळ 'त्या' वक्तव्यानंतर आता म्हणताय... 'माझ्या वक्तव्यावर ठाम'

Harshwardhan Sapkal Video : फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! हर्षवर्धन सपकाळ ‘त्या’ वक्तव्यानंतर आता म्हणताय… ‘माझ्या वक्तव्यावर ठाम’

| Updated on: Mar 17, 2025 | 6:01 PM

'भाजपमधील जी नेतेमंडळी आहेत ती सरसकट देवेंद्र फडणीस हे औरंगजेबासारखे होते असा जो कांगावा करत आहेत, याचाच अर्थ काय तर त्यांच्याच पक्षातील लोक फडणवीसांना औरंगजेब ठरू पाहात आहेत', असं सपकाळ म्हणाले

‘औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर’, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. “औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. नेहमी औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. तो कधी हजला गेला नाही. औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. फडणवीस देखील नेहमी धर्माचा आधार घेतात” , असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ मी काही चुकीचं बोललो नाही. मी काही फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख मी केला नाही.’, असे सपकाळ यांनी म्हटले तर  माझी टीका ही राज्यकारभाच्या अनुषंगाने आहे. मात्र असं असताना कालपासून त्यांच्याच लोकांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. माझी तुलना ही राज्यकारभाराशी होती, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

 

Published on: Mar 17, 2025 06:01 PM