संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक; आमरावतीत आज आंदोलन
महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं असून त्यावरून आता नवा वाद पेटला आहे. भिडे यांनी हे वक्तव्य अमरावती शहरात गुरूवारी आयोजित एका कार्यक्रमात केलं होतं.
आमरावती, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना गरळ ओकली आहे. महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं असून त्यावरून आता नवा वाद पेटला आहे. भिडे यांनी हे वक्तव्य अमरावती शहरात गुरूवारी आयोजित एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आता यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. तर भिडे यांच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या ॲड. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे. तर याच्याआधी ठाकूर यांनी भिडे यांच्यावर टीका करताना, ते कायम वाट्टेल ते बरळतात, दोन समाजात तेढ निर्माण करतात, तर युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात अशी टीका केली होती. त्याचबरोबर सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई का करत नाही. भिडेंचा बोलविता धनी कोण? त्यांना अभय कुणाचे? असा सवाल ही त्यांनी केला होता.