'भाजपच्या टीमकडून राहुल गांधी यांची बदनामी', काँग्रेस नेत्याची भाजपवर जहरी टीका

‘भाजपच्या टीमकडून राहुल गांधी यांची बदनामी’, काँग्रेस नेत्याची भाजपवर जहरी टीका

| Updated on: Sep 08, 2023 | 11:13 AM

VIDEO | 'देशात राहुल गांधी यांचे काम जोरदारपणे सुरू असताना त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने एक टीम त्यांच्या मागे लावली', असे म्हणत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

नांदेड, ८ सप्टेंबर २०२३ | काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातील २६ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली त्यानंतर काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. अशातच नांदेडमध्ये एका सत्कारा दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. देशात सध्या राहुल गांधी यांचे काम जोरदारपणे सुरू आहे, मात्र त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने एक टीम त्यांच्या मागे लावली आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीवर अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने रात्री नांदेडमध्ये त्यांचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात आलाय. या सत्काराला उत्तर देताना चव्हाण यांनी भाजपवर ही टीका केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आमचे काम सुरू असून प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चव्हाण यांनी याच कार्यक्रमात सांगितलंय.

Published on: Sep 08, 2023 11:13 AM