BIG BREAKING : अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा अन्...

BIG BREAKING : अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेस सदस्यत्वपदाचा राजीनामा अन्…

| Updated on: Feb 12, 2024 | 1:46 PM

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याच्या पत्रात असे म्हटले की....

मुंबई, १२ फेब्रुवारी, २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्राच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याच्या पत्रात असे म्हटले की, मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, धन्यवाद…. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलं त्यावर माजी विधानसभा सदस्य, भोकर विधानसभा मतदारसंघ जिल्हा नांदेड असा उल्लेख आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

Published on: Feb 12, 2024 01:45 PM