अजितदादा एकटे पडणार? राज्याच्या राजकारणात पुन्हा भूंकप होणार, कुणी केला मोठा दावा?
फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आहे. अजित पवार गटातील सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांच्यासह अजित दादांचे १२ नेते भाजपमध्ये सहभागी होणार? कुणी केला खळबळजनक दावा?
मुंबई, 11 मार्च 2024 : ‘फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आहे. अजित पवार गटातील सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांच्यासह अजित दादांचे १२ नेते भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे’, असे वक्तव्य करत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी हा मोठा दावा केला आहे. अजित दादांचे १२ नेते भाजपमध्ये जाणार असून उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येण्याचा दावाही अतुल लोंढे यांनी केला आहे. तर भाजप हा पक्ष सर्वांना धोका देईल, असे म्हणत अजित पवार भविष्यात एकटे पडू शकतात, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. “धोके पे धोका…. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार, सूत्रांची माहिती”, असा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर केला आहे.