जागांचा काथ्याकूट? फुटलेल्या गटात पुन्हा फूट, अजितदादांचे 12 नेते फुटणार? 'त्या' ट्वीटनं खळबळ

जागांचा काथ्याकूट? फुटलेल्या गटात पुन्हा फूट, अजितदादांचे 12 नेते फुटणार? ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

| Updated on: Mar 13, 2024 | 11:00 AM

जागांच्या काथ्याकूटमुळे फुटलेल्या गटातच अजून फूट पडण्याचे दावे होतायत. सध्या निवडणूक ही लोकसभेची असली तर अनेक आमदारांना विधानसभेचं टेन्शन आल्याची चर्चा आहे. फुटलेल्या अजित पवार यांच्या गटात आणखी एक फूट पडण्याचा मोठा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.

मुंबई, १३ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या जागांच्या काथ्याकूटमुळे फुटलेल्या गटातच अजून फूट पडण्याचे दावे होतायत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेलं ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आहे. सध्या निवडणूक ही लोकसभेची असली तर अनेक आमदारांना विधानसभेचं टेन्शन आल्याची चर्चा आहे. फुटलेल्या अजित पवार यांच्या गटात आणखी एक फूट पडण्याचा मोठा दावा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. एक दोन नव्हे तर तब्बल १२ नेते अजित पवार गटातून फुटणार असल्याचं भाकित अतुल लोंढेंनी वर्तवलंय. ‘धोके पे धोका…ऐसा कोई सगा नही… जिसे भाजपने ठगा नहीं…’, असं ट्वीट अतुल लोंढे यांनी केलं. तर सुनील तटकरे, धनंजय मुंजे यांच्या नेतृत्वात आदिती तटकरे, सुनील शेळकेंसह १२ बडे नेते आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार आणि उरलेले नेते आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत परत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Published on: Mar 13, 2024 11:00 AM