‘अध्यक्षांनी निर्णय लांबवणे ही लोकशाहीची हत्याच’; काँग्रेसनेत्याची नार्वेकर यांच्यावर निशाना
त्यांनी या दोन्ही गटाच्या आमदारांनी अपात्रता संदर्भात नोटीस पाठवली होती. त्यादरम्यान शिंदे गटाकडून उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती. तर अधिवेशामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर नार्वेकर यांनी प्रत्येक आमदाराचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकण्याचा निर्णय घेतला.
मुंबई, 9 ऑगस्ट 2023 । विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिंदे गट आणि ठाकरे गटातील अपात्र आमदारांच्या सुनावणीस गती दिली होती. त्यांनी या दोन्ही गटाच्या आमदारांनी अपात्रता संदर्भात नोटीस पाठवली होती. त्यादरम्यान शिंदे गटाकडून उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती. तर अधिवेशामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर नार्वेकर यांनी प्रत्येक आमदाराचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे गटाच्या ३९ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना असे प्रत्येकी एक दिवस जरी दिला तर यात दिड महिना जाणार आहे. यावरून आता काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी टीका केली आहे. तर अशा पद्धतीने निर्णय ढकलले ही लोकशाहीची हत्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश अध्यक्षांना पाळावे लागतील. सुप्रीम कोर्ट ऑगस्टपर्यंत वाट पाहील आणि जर तसं नाही झालं तर न्यायालयच यावर निर्णय देईल असं वाटतं.