एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा, भाजप नेत्याच्या जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर काय पलटवार?
एकनाथ खडसे हे विझलेला दिवा आहे. अशी जिव्हारी लागणारी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. यासह ते असेही म्हणाले होते की, एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही. त्यांची ग्रामपंचायत त्यांची नाही, असे वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर खडसे यांचं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर
गिरीश महाजन हे दिशाभूल करण्याचं काम करत आहे, असं वक्तव्य करत काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केलाय. गिरीश महाजनांना कदाचित माहिती नसेल मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एक दोन ग्रामपंचायती सोडल्या तर सर्वच्या ग्रामपंचायती माझ्या ताब्यात आहेत. माझ्या गावची कोथळीची ग्रामपंचायत ही माझीच आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विचारावं, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेनंतर पलटवार केला आहे. इतकंच नाहीतर गिरीश महाजन यांनी अधिक माहिती घेतली असती तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली असती, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना खोचक टोलाही लगावला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे विझलेला दिवा आहे. अशी जिव्हारी लागणारी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. यासह ते असेही म्हणाले होते की, एकही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही. त्यांची ग्रामपंचायत त्यांची नाही, असे वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलं आहे.