जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? अमित शाह यांच्या 'त्या' टीकेवरून काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेवरून काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Feb 28, 2024 | 6:02 PM

गृहमंत्री अमित शाह यांनी टीव्ही9 च्या ग्लोबल समिटमधून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. यावर काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांना विचारले असता त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, घराणेशाही भाजपात... जय शाह क्रिकेट कंट्रोल बोर्डावर कसा आला? असा सवालही त्यांनी केलाय.

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : ‘मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. तर घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत’, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी टीव्ही9 च्या ग्लोबल समिटमधून केली. यावर काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांना विचारले असता त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, घराणेशाही भाजपात आहे. अमित शाह यांचा मुलगा जय शाह क्रिकेट कंट्रोल बोर्डावर कसा आला? असा सवाल करत काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. इतकंच नाहीतर जय शाह हा क्रिकेट कंट्रोल बोर्डावर आहे त्याला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? ही घराणेशाही नाही का? असे म्हणत ठाकरे आणि गांधी कुटुंबावर तुम्ही आरोप करतात… हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता…ही भाजपची घराणेशाही नाही का? असा आक्रमक सवाल काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांनी भाजपवर केला. आमचे नेते घेतले आणि भाजप घराणेशाही करत आहे, तुमच्यात क्षमता नाही, तुम्ही पक्ष फोडून नेते आयात करत आहात, असा हल्लाबोलही त्यांनी भाजपवर केला.

Published on: Feb 28, 2024 06:02 PM