राजकारण आणि धर्मात मिसळ केली तर…, काँग्रेस नेत्यानं काय केलं भाष्य
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राडा प्रकरणी काँग्रेस नेत्यानं व्यक्त केली नाराजी
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. शाब्दीक चकमकीनंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. संभाजीनगरमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राड्याप्रकरणी काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मत व्यक्त करताना म्हटले की, सध्याच्या परिस्थिती गंभीर असून ही स्थिती समाजासाठी घातक आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून या परिस्थितीविषयी भीती व्यक्त केली जात आहे. धर्मावरून ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. धर्म हा ज्याचा त्याचा आहे त्यामुळे धर्माविषयी वाद निर्माण करून सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे पूर्णतः चुकीचे आहे. राजकारण आणि धर्म यांच्यामध्ये मिसळ केली तर देशाची प्रगतीही खुंटते त्यामुळे या सगळ्या घटनांचा समाजावर विपरित परिणाम होतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.