Chandrakant Patil यांना आम्हा कधी चंपा, टरबुज्या म्हणत नाही, Nana Patole यांचं खोचक टीकास्त्र
शरद पवारांनी जे म्हटले ते योग्य आहे. ते मला आदरणीय आहेत मी कधीच त्यांच्यावर बोललो नाही, बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. (Congress leader Nana Patole reaction bjp leader Chandrakant Patil)
मुंबई : चंद्रकांत पाटील यांचा तोल घसरलाय. आम्हा कधी त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणत नाही. मात्र त्यांच्या केंद्रीय नेत्यांना लोक आता पप्पू म्हणायला लागलेत. उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात ते काही चुकीचे आहे असे वाटत नाही, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आमच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाही अशा तक्रारी आहेत, त्याबाबत मी उद्धव ठाकरेंना भेटून बोलणार आहे. भाजपा बहुजन चेहऱ्याचा वापर करते, गोपीनाथ मुंडे साहेबांना देखील पक्षातून बाहेर पडायची वेळ आणली होती. कुणाच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही आम्हाला संडासावर आणि कोरोना लसीवर फोटो लावायची गरज नाही. शरद पवारांनी जे म्हटले ते योग्य आहे. ते मला आदरणीय आहेत मी कधीच त्यांच्यावर बोललो नाही, बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
Latest Videos