अमृता आमची लहान सूनबाई..., ब्लॅकमेलिंग प्रकरणावर नाना पटोले यांची नेमकी काय प्रतिक्रिया

अमृता आमची लहान सूनबाई…, ब्लॅकमेलिंग प्रकरणावर नाना पटोले यांची नेमकी काय प्रतिक्रिया

| Updated on: Mar 18, 2023 | 5:06 PM

VIDEO | अमृता आमची लहान सुनबाई, देवेंद्र माझे भाऊ आहेत त्यांच्यावर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर..., काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेमकी काय दिली प्रतिक्रिया

नागपूर : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० कोटींची लाच ऑफर करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमृता आमची लहान सुनबाई आहे. देवेंद्र फडणवीस माझे भाऊ आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर त्यांचं समर्थन करण्याचं कारण नाही. मात्र जर गृहमंत्री यांचं घर सुरक्षित नसेल तर ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकणात अनिक्षा अनिल जयसिंधानी या डिझायनरला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून तिची चौकशी केली जात आहे.

Published on: Mar 18, 2023 05:06 PM