Nana Patole | भाजपने ओबीसींचा घात केला, आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये – नाना पटोले

| Updated on: May 31, 2021 | 1:58 PM

भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.