Nana Patole : ‘मी राजीनामा देण्यास तयार’, मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
सोलापूर जिह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी ईव्हीएमचा विरोध दर्शवला आणि मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची मागणी केली. अशातच सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन दिवसांपासून मारकडवाडीला भेट देत सभा घेताना दिसताय
विधानसभेतील महायुतीच्या दणदणीत विजयानंतर विरोधक अर्थात मविआ सातत्याने भाजपसह महायुतीच्या मोठ्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित घेत शंका व्यक्त करताना दिसतेय. अशातच सोलापूर जिह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी ईव्हीएमचा विरोध दर्शवला आणि मतदानाची सत्यता पडताळण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची मागणी केली. अशातच सत्ताधारी आणि विरोधक गेल्या दोन दिवसांपासून मारकडवाडीला भेट देत सभा घेताना दिसताय. आज महायुतीने या गावाला भेट देत मविआवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आज मरकडवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘निवडणूक आयोग कुणाची कठपुतली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपावाले राजीनामे देण्याचं आव्हान देत आहेत. उत्तमराव जानकर यांनी सांगितलंय आणि मीसुद्धा सांगतो की, जर निवडणूक आयोग ईव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेणार असे जाहीर केलं तर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहोत. ‘, असं नाना पटोले म्हणाले. मात्र निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार असल्याचं त्यांनी लिहून द्यावं, असेही ते म्हणाले.