महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा काय?
पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असणार आहे. मात्र घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ साली आला. या कायद्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवं, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
पुणे, १० जानेवारी २०२४ : जर शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं आणि त्यांना पुन्हा मंत्री होता आलं नाही, अशी परिस्थिती उद्भवली तर तो राजकीय भूंकप ठरेल, असा मोठा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तर पक्षांतर कायदा बदलायला हवा आणि याचे राजकीय परिणाम वाईट आहेत. घटनात्मक तरतूद काय आहे हे पाहायला हवं. आजचा निकाल हा अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय असणार आहे. मात्र घटनात्मक पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा १९८५ साली आला. या कायद्याचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. या कायद्याला बदलायला हवं, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी असतात त्यामुळे ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचे हित बघणार नाहीत, असं होणार नाही. या निकालाला दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. मात्र आज ४ वाजता काय निर्णय होईल हे पाहावं लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.